वधू - वर परिचय मेळावा


दिनांक : १३ एप्रिल २०२१ ( मंगळवार ) स्थळ :श्री विश्वरूप हॉल ,९३,ज्योतीनगर,औरंगाबाद

या कार्यक्रमात :

  • १) कार्यक्रमाच्या सुरवातीलाच परिचयाची कार्यपद्धती सांगितली जाते ती नीट ऐकावी .
  • २) वधु-वरांचे नाव व क्रमांक उच्चारले जाताच त्यांनी पालकांसह माईकवर यावे . वधु -वरांनी फक्त आपले नाव व शिक्षण सांगायचे . अपेक्षा व इतर परिचय भावबंधन देईल .
  • ३) परिचय चालू असताना इतरांनी आपल्या पाल्यास अनुरूप स्थळांचे नाव व क्रमांक लिहून घायचे आहेत .
  • ४) मध्यंतरात याच क्रमांकाने माईकवरून आवाहन करून एकमेकांशी संपर्क करायचा असतो .
  • ५) भावबंधनच्या वर्गणीदारांनी किंवा वर्गणीदार नसलेल्यांनाही या कार्यक्रमात सहभागी होता येईल .

हे सर्वांत महत्त्वाचे :

  • १) वधु-वर यांची उपस्थिती अनिवार्य आहे . (त्याशिवाय प्रवेश नाही ) ज्यांचा मुलगा किंवा मुलगी परदेशात आहे अशा पालकांनाच पूर्वसंमतीने उपस्थिती राहता येईल .
  • २) कार्यक्रमात संपूर्ण शांतता व शिस्त राखणे .
  • ३) मेळावा संपेपर्यंत थांबणे .
  • ४) मेळाव्यानंतर भावबंधनशी संपर्कात राहणे .
  • ५) विवाह जुळल्याची सूचना भावबंधनला त्वरीत देणे .
  • ६) कृपया लहान मुलांना सोबत आणू नये .
  • ७) वैयक्तिक फोटोग्राफी,शुटिंग करू नये. त्यासाठी भावबंधनचा अधिकृत फोटोग्राफर आहे .

कार्यक्रमाचे वेळापत्रक :

  • १) १२:०० ते ६:०० वधु-वर परिचय .
  • २) ३:०० ते ६:०० निवडलेलया अनुरूप वधु-वर त्यांच्या कुटंबीयांची भेट व परस्पर परिचय .
  • ३) भावबंधनचे वर्गणीदार, यापुर्वी नोंदणी केलेल्य सदस्यांनाही शुल्क देणे आवश्यक आहे .
  • ४) या कार्यक्रमास वधु/वर,त्यांचे पालक यांनाच प्रवेश देण्यात येईल.

आपले विनीत

मार्तंड कौसडीकर

मो. नं. - ८०८७८८०२९०

फो.नं. - (०२४०) २३६५०१०